परभणी दि. 9 फेब्रुवारी (समाजहित न्यूज वृतात)
जिल्हा सामान्य रुग्णालय येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कामे एक एक करून मार्गी लावण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये येत असलेले रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक यांना सोयी सुविधा उपलब्ध होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा आल्यापासून रुग्णालयात अनेक सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ.एस.एस. भिसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लखमवार, उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सारिका बडे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात येत आहेत. तसेच वाहतुकीत अडथळा निर्माण होणाऱ्या खाजगी रुग्णवाहिका व इतर वाहने यांना रुग्णालयाच्या परिसरात लावण्यास प्रतिबंधित करून रुग्णालयातील वाहतूक सुरळीत करण्यास मदत झाली आहे. तसेच रुग्णालय परिसरातील असलेले खड्डेमय रस्ते दुरुस्त करून रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्याच प्रमाणे रुग्णालयातील स्वच्छतेचे व सुरक्षिततेची सुद्धा विशेष लक्ष दिल्या जात असल्याने रुग्णालयात येणारे रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

