परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) मा.श्री. रविद्रसिंह परदेशी पोलीस अधीक्षक परभणी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच पोलीस निरीक्षक विवेकांनद पाटील यांना अंमली पदार्थ वाहतुक विक्री करणारे इसमांचा शोध घेवुन आगाऊ माहीती काढून कार्यवाही करण्या बाबत चे आदेशीत केले. त्या अनुषंगाने दिनांक ०८/०२/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील सपोनि / राजु मुत्येपोड, पोउपनि चंदन परीहार व त्यांचे पथकाला गुप्त बातमीदारांमार्फत खात्री शीर माहीती मिळाली की, रेल्वे स्टेशन बाहेर काही इसम गांजा विक्री व वाहतुकीसाठी ताब्यात बाळगुन आहे अशी माहीती मिळाली मिळालेल्या माहीती प्रमाणे रेल्वे स्टेशनचे बाहेर छापा मारला असता सदर ठिकाणी इसम नामे (१) शेख अकबर शेख जाफर वय २५ वर्षे व्यवसाय मजुरी रा. इंदिरा नगर परतुर जि जालना (२) सुनिल सुंदर हरिजन वय १९ वर्षे व्यवसाय मजुरी रा. पकनागुडा पोस्टे हुम्मर ता. भोईपरीगुडा जि. कोराकुटा राज्य ओरीसा यांना पकडण्यात आले व त्यांचेकडुन ३२.२०० किलोग्रॅम गांजा किमंत अंदाजे ६,०४,०००/- रुपयाचा पंचा समक्ष जप्त करण्यात आला. तसेच सदर इसमांकडे अधिक विचारपुस केला त्यांना सदरचा गांजा हा त्यंना त्यांचा साथीदार (३) शेख कलीम शेख जहुर रा. परतुर जि.जालना याचेकडुन घेतल्याचे सांगीतले व तो रेल्वेन मानवत कडे गेल्याचे सांगीतले तेव्हा पथकाने पाठलाग करुन त्यास पकडले आहे सदर आरोपी विरुध्द एनडीपीएस कायदया प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन नवामोंढा येथे करणार आहे. सदरची कामगिरी मा.श्री. रविद्रसिंह परदेशी यांचे मार्गदर्शनात, श्री. यशवंत काळे अपर पोलीस अधीक्षक परभणी यांचे नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. दिनकर डंबाळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विवेकांनद पाटील, पोस्टे नवामोंढा पोलीस निरीक्षक श्री. पांडुरंग गवते, नायब तहसीदार श्री. विष्णु पकवाने व स्थानीक गुन्हे शाखेचे पथकातील सपोनि श्री. राजु मुत्येपोड, पोउपनि श्री. गोपीनाथ वाघमारे, पोउपनि श्री. अजित बिरादार, पोउपनि श्री. चंदनसिंह परीहार पोलीस अंमलदार मधुकर चटटे, जक्केवाड, तुपसुंदरे, सुग्रीव केंद्रे, कांगणे, निलेश भुजबळ, रवि जाधव, सुलक्षण शिंदे, विलास सातपुते, रंगनाथ दुधाटे, राहुल परसोडे, सुर्यकांत फड, सचिन भदर्गे, रणजीत आगळे, शंकर गायकवाड, जमीर फारुखी सिध्देश्वर चाटे, चव्हाण, गजानन क्षिरसागर, रफिकोददीन, हनुमान ढगे, निलेश परसोडे राम पौळ, नामदेव डुबे, हनुमान डुबे, परसराम गायकवाड, शंकर सावंत, पोना ढवळे, सायबर शाखेचे गणेश कौटकर, बालाजी रेडडी, हनवते, संजय घुगे, इम्रान यांनी केली

