अ जा आयोगाचे उपाध्यक्ष यांच्या कडे रिपाइं चे पंडित टोमके यांनी केली मागणी.
परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या वतीने आज दिनांक ७ फेब्रुवारी रोजी दुपारी भेट दिली असून आयोगाचे उपाध्यक्ष ना मेश्राम यांनी समाजकल्याण आयुक्त यांच्या मार्फत परभणी जिल्हा शांततामय रहावा व संविधानाच्या प्रतिकृती विटंबना प्रकरणात शहिद सोमनाथ सुर्यवंशी मुत्यु प्रकरणी आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती, या बैठकीत पंडित टोमके मराठवाडा प्रदेश रि पा इं यांनी उपस्थित राहून परभणी जिल्हा शांतता प्रिय जिल्हा असून शासनाला सहकार्य केले आहे असे आयोगाच्या उपाध्यक्ष यांना सुचवले तसेच पोलीस अधिकारी अशोक घोरबांड, अती पो अ काळे, पो ऊ नि बळीराम बंद खडके, यांच्या सह कोबींग आपरेषण प्रकरणी दोषी पोलिसांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, संविधानाच्या प्रतिकृती विटंबना प्रकरणात आंदोलनात सहभागी भिम सैनिकांसह ताडपांगरी भीम जयंती २८/०४/२०२४ मध्ये दाखल भिम सैनिकांवरिल गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच शहिद सोमनाथ सुर्यवंशी, मयत विजय वाकोडे यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे,भरिव आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी मेश्राम यांच्या कडे बैठकीत मागणी केली पंडित टोमके मराठवाडा प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले,यावेळी आज मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने रमाबाई आंबेडकर व डॉ बाबासाहेब आंबेडकर,शाहु महाराज,महात्मा फुले यांना पंडित टोमके यांनी अभिवादन केले.आयोगाचे उपाध्यक्ष मेश्राम यांनी मातोश्री रमाबाई यांना जयंती निमित्त अभिवादन केले. यावेळी समाज कल्याण आयुक्त गुट्टे, भोजने मॅडम समाज कल्याण अधिकारी,डि एन दाभाडे,गौतम मुंडे, उमेश शेळके, नारायण वाघमारे,सुनील कोकरे, अमोल रगडे भगवान कांबळे, यशवंत मकरंद, ईत्यादी अनेक जण उपस्थित होते.

