मानवत ( समाजहित न्यूज वृत्तांत )मानवत येथील सौ. रामकंवर द्वारकादास लड्डा पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मानवत या विद्यालयांमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारोप कार्यक्रमाचे आयोजन १७ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. यावेळी निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय संचालक श्री संजय लड्डा तर प्रमुख उपस्थिती मध्ये शिक्षण सल्लागार तथा प्रशासक श्री प्रवीण बेले, पर्यवेक्षक श्री. विलास शिंदे, मुख्याध्यापक श्री. विश्वभूषण इंगोले हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख उपस्थिती श्री. प्रवीण बेले यांनी विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या बाबतीत नियोजनबद्धता असावी. व सर्व नियमांचे तंतोतंत पालन करत काळजीपूर्वक पेपर सोडवावा असे मत व्यक्त केले. तर अध्यक्षीय समारोपा मध्ये श्री संजय लड्डा यांनी विद्यार्थ्यांनी परीक्षेला आत्मविश्वासाने - संयमाने सामोरे जावे त्यातून यश निश्चित प्राप्त होईल असे मत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी देखील आपल्या मनोगतातून शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी सर्वांच्या वतीने सर्व एस. एस. सी मार्च 2025 परीक्षेमध्ये प्रविष्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तुंग यश संपादित करण्याबाबत शुभेच्छा देण्यात आल्या.
.

