सकाळी 8.00 वा. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
पुतळ्यापासून होणार पदयात्रेस प्रारंभ
पदयात्रेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8.00 वाजता परभणी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून भव्य “जय शिवाजी जय भारत पदयात्रा” काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत मोठया संख्येने विद्यार्थी, युवक व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे. पदयात्रेचा मार्ग पुढील प्रमाणे असणार आहे. पदयात्रेची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून होणार आहे. पुढे विसावा कॉर्नर, परभणी सिटी क्लब, कन्या प्रशाला, नारायण चाळ कॉर्नर, आर.आर. टॉवर, अष्टभुजा देवी मंदिर, गांधी पार्क, शिवाजी चौक, मुनलाईट शुज शॉप कॉर्नर, गुजरी बाजार, गांधी पार्क, नारायण चाळ, महात्मा फुले पुतळा मार्गे पदयात्रेचा समारोप श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी होणार आहे. या पदयात्रेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत देखावे, पारंपारिक वेशभुषाधारी युवक-युवती, ढोल-ताशा पथक, घोडेस्वार, खेळाडू, विद्यार्थी आदींचा सहभाग राहणार आहे. या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी सकाळी 7.30 वा. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

