परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांचे मार्गदर्शनात परभणी पोलीस नेहमीच दक्ष राहून तत्परतेने आपले कर्तव्य पार पाडीत आहेत. दिनांक ०६/०२/२०२५ रोजी लातूर जिल्हा चाकुर तालुक्यातील एका गावातील शिक्षण घेणा-या विदयार्थीचा घरातील पालकांसोबत किरकोळ वाद झाल्याने सदरची मुलगी रागाच्या भरात घरातुन निघुन शाळेत न जाता लातुर जिल्हयातून एस.टी. बसने काल रात्री नऊ वाजता दरम्याण परभणी बसस्टॅण्ड येथे उतरली व पायी चालत जात असतांना जामनाका चौकी येथे कर्तव्यावर हजर असलेल्या पोलीस अंमलदार व होमर्गार्ड यांनी सदर मुलीला थांबवून विचारणा करून सुरक्षेकरीता पोलीस स्टेशन कोतवाली येथे घेवुन आले. तेथे नमुद मुलीस विश्वासात घेवुन विचारपुस करता तिने आई सोबत किरकोळ वाद झाल्याने रागाच्या भरात घरातुन निघुन आल्याचे सांगीतले, तिकडे मुलगी घरी परत आली नाही म्हणून तिचे पालक सुध्दा अस्वस्थ होवुन मुलीचा शोध घेत होते. तेव्हा लगेच कोतवाली पोलीसांनी नमुद मुलीच्या आईला संपर्क केला तेव्हा नमुद मुलीची आई लगेच परभणी येथे आली. व मुलीला सुखरुप पाहून त्यांना अत्यंत आनंद झाला. कोतवाली पोलीसांनी विचारपुस करुन मुलीस तिच्या आईच्या ताब्यात दिले. कर्तव्यावरील परभणी पोलीसांच्या तत्परतेमुळे नमुद मुलगी सुखरुप आईला परत मिळाली सदर पोलीस अंमलदार व होमगार्ड यांचे पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह परदेशी यांनी कौतुक करुन अभिनंदन केले.

