परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत )मा. श्री रविद्रसिंह परदेशी, पोलीस अधिक्षक साहेब यांनी परभणी जिल्हयात होत असलेल्या तार चोरी च इतर अॅल्युमीनीयम च कॉपर चोरीचे अनुषंगाने माहीती काढून गुन्हे उघड कराचे च आरोपी निष्पण करुन मृदेमाल हस्तगत करणे बाबत स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते, स्थानिक गुन्हे शाखचे पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, आरोपी नामे लक्ष्मण भागोजी पवार रा गरहा ता.परभणी, आरोपी ०२ जय भगवान काले रा नृसिंह साखर कारखाना जवळ शिगनापुर यांनी व त्याचे इतर साथीदार यांनी मिळून निपाणी टाकळी ते करडगाव रोड सेलू येथील तसेच परभणी जिल्हयातील इतर भागातील लाईटचे पोल वरील अॅल्युमिनीयम तार चोरी केली आहेत अशी माहीती मिळाल्याने सापळा लावुन शिताफीने ताब्यात घेतले त्यास कार्यालयात आणुन विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांना परभणी जिल्हयात मागील एका वर्षा पासून इझालेल्या लाईट पोल वरील अॅल्युमीनीयम तार चोरी बाबत मान्य करुन मॅक्स पिकअप क्र एमएच ११ जी ३०१० व लक्ष्मण पवार यांचे टाटा एस क्र एम एच २२ ए एन ३८३५ अशी चाहाने आळीपाळीने वापरत असल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेले अॅल्युमिनीयम तार सयद कलीमोदीम सयद जैनुलाब्दीन रा काद्राबाद प्लॉट परभणी बांना विक्री केल्याचे सांगीतले, आरोपी च त्यांचे साथीदारांनी चारचाकी वाहनाने परभणी जिल्हयातील गंगाखेड ०१. सेलू ०३. दैठणा ०२ ताडकळस ०१, परभणी ग्रा ०१ असे ०८ गुन्हे चोरी केल्याचे निष्पन्न झाले असुन आरोपीकडून चोरी करुन विक्री केलेल्या मुददेमालाचे रक्क्मेपैकी ३,५०,०००/- रु नगदी दोन चारचाकी वाहने व तीन मोचाईल असा एकूण १३,८०,२००/- रु चा मुददेमला जप्त करण्यात आला असुन आरोपीतांना सेलु पोस्टला पुढील तपासकामी हजर करण्यात आले आहे. सदरची कारवाई श्री रविंद्रसिंह परदेशी, पोलीस अधिक्षक साहेब यांनी परभणी यांचे मार्गदर्शना खाली मा.श्री. यशवंत काळे अपर पोलीस अधिक्षक साहेब यांचे नेतृत्वात श्री चिचेकानंद पाटील साहेब पोलीस निरीक्षक स्वागुशा यांचे पथकातील सपोनि /भारती, सपोनी / राजु मुत्येपोड, पोउपनी गोपीनाथ वाघमारे, पोउपनी अजित बिरादार, पोउपनी चंदन परीहार, सपोउपनी मधुकर चटे, सपोउपनी/जेक्केवाड, पोह/६६४ तुपसुंदरे, पोह/१०७८ चिलास सातपुते, पोह/ ६३५ केंद्र, पोह/३५९ भुजबळ, पोह/१२५४ गायकवाड, पोह/ ४४४ फारुखी पोह/४५९ जाधव, पोह/१११६ दुधाटे, पोह/१०७५ भदर्गे, पोह/ १३६२ फड पोना/८३३ चव्हाण, पोशी/१६४० डवळे, पांशी/५८९ तुगे, पोशी / १४८७ क्षिरसागर पोह/१६८८ रफीयोदीन पोशी / ८४१ परसोडे, चालक पोह/५०२ पूगे पाह/ ७१२ हुमेन महीला पोह/९९१ अव्हाड ने स्थागुशा परभणी यांनी केली.

