परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) शहरातील माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाचे तृतीय माजी अध्यक्षा स्मृतीशेष द्रौपदाबाई अशोकराव अंभोरे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त आज दिनांक 6 फेब्रुवारी 2025 लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा कार्यालय येथे डॉ. आंबेडकर नगर आयटीआय कॉर्नर जिंतूर रोड परभणी येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दोन मिनिट स्तब्ध राहून अभिवादन करण्यात आले आहे. स्मृतीशेष द्रोपदाबाई अंभोरे या लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ चे परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष, तथा संस्थापक अध्यक्ष सामाजिक न्यूज महाराष्ट्र राज्य तथा संस्थापक अध्यक्ष समाजहित अभियान प्रतिष्ठान यांच्या मातोश्री आहेत. यावेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, परभणी जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अशोकराव अंभोरे, समाजहित न्यूज व्यवस्थापक प्रतिनिधी संदीप वायवळ, पत्रकार संघाचे तालुका शहर संघटक अब्दुल कलीम, ज्येष्ठ पत्रकार युनूस कच्ची, सामाजिक कार्यकर्ते शेख सरफराज, पत्रकार संदीप ढाले आदींच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

