परभणी: (समाजहित न्यूज वृत्तांत) नेहमीप्रमाणे मुक्कामी येणारी बस सेवा अचानक बंद झाल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. ही सेवा बंद असल्याने विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, तसेच शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत.शिवाय या महिन्यात बारावी आणि दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या समस्येच्या तातडीने सोडवणुकीसाठी संबंधित आगार प्रमुखांकडे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी आणि बस सेवा पूर्ववत सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, ही बस सेवा बंद झाल्याने त्यांना खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे, ज्यामुळे आर्थिक भार वाढला आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा बंद झाल्यास सामान्य नागरिकांना त्याचा मोठा फटका बसतो, हे प्रशासनाने लक्षात घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सदरील निवेदन ऋजु प्रतिष्ठानच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष अमोल लांडगे, सचिव एकनाथ भालेराव, तसेच सामाजिक कार्यकर्ते गोविंद गिरी, गडदगव्हाण, मोहखेड आणि वाडी तांडा येथील रहिवाशी, मधुकर भालेराव, राजेश घोडके, बाळू आप्पा मठपती, केशव मगर, रमेश बेले, गजानन नांदेडकर, जगन्नाथ भालेराव, पांडुरंग भालेराव, घनश्याम भालेराव यांनी सादर केले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.

