मानवत ( समाजहित न्यूज वृत्तांत )सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय, तसेच जिल्हा न्यायालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तालुका न्यायालय तालुका विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघ मानवत यांच्या संयुक्त विद्यमाने मानवत तालुक्यातील मौजे देवलगाव ( आ ) व ताडबोरगाव येथे १२ फेब्रुवारी रोजी विधी साक्षरता शिबिराचे आयोजन केले होते तसेच ताडबोरगाव येथे फिरते लोक न्यायालय घेण्यात आले. वेळी मानवत तालुका वकील संघाचे अध्यक्ष श्री अॅड. अनिरुद्ध पांडे, मा. अध्यक्ष अॅड. दिनेश दशरथे, अॅड. वैजनाथ अवचार, अॅड. बुलंगे, अॅड. मुकुंद पाटील यांच्या सह ताडबोरगाव व देवलगाव अवचार येथील तलाठी ग्रामविकास अधिकारी, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिबिरामध्ये अॅड. वैजनाथ अवचार यांनी महिलां बद्दलचे कायदे तसेच स्त्री भ्रूणहत्या कायदा या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मानवत न्यायालयाचे न्यायाधीश श्री. जी. ए. करजगार, वरिष्ठ कारकून श्री. राजेश सूर्यवंशी, विधी सेवा प्रमुख श्री. रहमान, स्टेनो अजिंक्य ढाकणे, बेलीफ राऊत व लोहकरे, सहाय्यक सरकारी अभियुक्त लिंगने, संगणक विभाग प्रमुख संतोष अग्रवाल, सेवक नागनाथ करवलकर आणि पोलीस प्रशासना मार्फत जवान उपस्थित होते. कार्यक्रमाचा सरते शेवटी न्यायाधीश करजगार यांनी जळ जळ योग्य प्रकरणे कशाप्रकारे मिटवायचे त्याचे फायदे काय असतात, स्त्रियांचे कायदे तसेच इतर बऱ्याच कायदेशीर गोष्टींवर लोकांना मार्गदर्शन केले.
फिरते लोक न्यायालय या संकल्पने नुसार ताडबोरगाव येथे बरीच तडजोड योग्य प्रकरणे ठेवण्यात आली होती त्या मध्ये न्यायाधीश महोदय तसेच पॅनल मेंबर्स यांनी तडजोड करण्याचा प्रयत्न केला.यावेळी मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.



