परभणी ( समाजहित न्यूज वृत्तांत ) रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती निमित्त शहरातील जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग च्या वतीने दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा परिषद परभणी समाजकल्याण विभाग चे समाजकल्याण अधिकारी श्रीमती भोजने मॅडम, समाज कल्याण विभाग ओ.एस. तथा समाज कल्याण निरीक्षक श्री राहुल काळे, वरिष्ठ लिपिक श्री वशिष्ट मस्के,कनिष्ठ लिपिक जाधव मॅडम, समाजकल्याण निरीक्षक श्री सय्यद, लेखापाल श्री इंगळे, कनिष्ठ लेखापाल श्री श्रीकांत ठाकरे, लिपिक श्री भराडे, श्री कमळे, श्री राठोड, श्री देशमुख, श्री प्रल्हाद लांडे, श्री शेख तसेच जिल्हापरिषदेतील अधिकारी कर्मचारी आदींच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले आहे.

