परभणी, दि. 20 (समाजहित न्यूज वृत्तांत ) : हिंगोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि मुख्य न्यायदंडाधिकारी या न्यायालयांचे तसेच नूतन न्यायालयीन इमारतीचे उदघाटन शनिवार, दि. 22 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10.30 वा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यनशिवराज खोब्रागडे यांची उपस्थिती राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती नितीन सांबरे, न्यायमूर्ती नितीश सूर्यवंशी, परभणी येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्ज्वला एम. नंदेश्वर, नवीन न्यायिक जिल्ह्याचे पहिले प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलेले तुफानसिंग एस. अकाली हे उपस्थित राहणार आहेत, असे जिल्हा न्यायालय, परभणीचे प्र.प्रबंधक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

