नांदेड (समाजहित न्यूज वृत्तांत) दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी, विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात, नांदेड शहरातील शाळकरी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम व सायबर गुन्ह्यांसंदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वाहतुकीच्या नियमांची पुरेशी माहिती नसल्याने, अनेक शाळकरी मुलांना देखील रस्ते अपघातास सामोरे जावे लागते. शाळकरी मुले घरातून बाहेर पडल्यानंतर याबाबत पालकांना नेहमीच चिंता वाटत राहते त्याचप्रमाणे, अलीकडे अनेक शाळकरी मुले ही आपल्या पालकांच्या मोबाईलवरून अनेक सोशल साईट पाहत असतात, बन्याचदा, यातून सायबर अपराधास निमंत्रण मिळते व अनेक लोक अशा अपराधांस बळी पडतात. रहदारीचे नियम व सायबर सुरक्षा ह्या शाळकरी मुलांसमोरील महत्त्वाच्या समस्या लक्षात घेऊन पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी, शहरातील शाळकरी मुलांसाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी, पोलीस उप महानिरीक्षक यांचेसह पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री एस एल गुट्टे, उपनिरीक्षक श्री कोटतीर्थवाले यांनी उपस्थित विद्याध्यर्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात नांदेड शहरातील ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल येथील सुमारे दीडशे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित विद्याथ्यांना पोलीस दलातील विविध प्रकारच्या शस्त्रांचे देखील प्रदर्शन दाखविण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यांसाठी वाहतूक व सायबर विषयावर मार्गदर्शन
February 20, 2025
0
पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा पुढाकार

