परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) पोलीस स्टेशन नानलपेठ पाहिजे आरोपी लिस्ट क्रमांक 64 मधील तसेच गुरनं 65/2021 कलम 392,34 भादवि मधील फरार असलेला व ज्याचा पोलीस शोध घेत होते आरोपी नामे - राजु लक्ष्मण शिराळे, वय-32 वर्ष, व्यवसाय- मजुरी, रा. विकास नगर, ह.मु. पंचवटी नगर, वाटर प्लांट, कृषी नगर परभणी हा परभणी शहरात आल्याची गोपिनीय माहिती मिळाले वरून.. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने त्यास सापळा रचून अतिशय शीताफिने ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करिता पोस्टे नानलपेठ येथे हजर केले आहे. सपोनि मुत्येपोड, सपोउपनि चटटे, पोह केंन्द्रे, पोह जाधव, पोह फड, पोशि शेख रफियोददीन, पोशी परसोडे या पथकाने कारवाही केली आहे.

