नांदेड (समाजहित न्यूज वृत्तांत) महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय ललित कला भवन लेबर कॉलनी नांदेड येथे दोन सत्रामध्ये २७ वी राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धा २०२५ नुकतीच पार पडली असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून एकुण ३०० लोकनृत्य स्पर्धकांनी सहभाग नोंदवून आपआपली नृत्यकला सादर केली असून यामध्ये पाच विजेते स्पर्धकांची निवड होवून त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कल्याण आयुक्त रविराज इळवे हे होते तर उद्घाटक म्हणून खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करून स्पर्धेला सुरूवात झाली. द्वितीय सत्रात बक्षीस वाटप करण्यात आले. यावेळी विचारपीठावर प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय सांस्कृतीक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ. श्रीमती सान्वी जेठवाणी, गुरूद्वारा सचखंड बोर्ड अधिक्षक गुरुबचनसिंघ शिलेदार, आ. बालाजी कल्याणकर, उपकल्याण आयुक्त नंदलाल राठोड, सहाय्यक कल्याण आयुक्त भालचंद्र जगदाळे संभाजीनगर, सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड रोहन रूमाले, कामगार कल्याण अधिकारी नांदेड प्रसाद धस, केंद्र संचालक विलास मेंडके, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे एस.टी. मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, रत्नाकर शिंदे पाटील, कॉ. पंडित तेलंग, रामदास पेंडकर, नृत्य स्पर्धा निवड परिक्षक श्रीमती किरण टाकळे, शिवाजी चवरे, जावेद सादेक शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वरील मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. शेवटी अध्यक्षीय समारोप रविराज इळवे यांनी करून मार्गदर्शन केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते निवड झालेल्या पाच स्पर्धक विजेत्यांना पारितोषिक वितरीत करण्यात आले. प्रथम क्रमांक गट कार्यालय कोल्हापूर बक्षीस १० हजार रूपये, द्वितीय क्रमांक नायगाव मुंबई बक्षीस ८ हजार रूपये, तृतीय क्रमांक वरळी मुंबई बक्षीस ६ हजार रूपये, चतृर्थ क्रमांक नागपूर-२ बक्षीस ३ हजार रूपये, पाचवे बक्षीस चिपळून ३ हजार रूपये देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदलाल राठोड यांनी केले तर सुत्रसंचालन विजय अहिरे व विलास मेंडके यांनी केले, आभार प्रदर्शन प्रसाद धस यांनी मांडले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी कामगार कल्याण मंडळाचे हणुमान सवंडकर, व्हि.व्हि. वायवळ, बालाजी पतंगे, श्रीमती सविता पांडे, अनिता केळकर, मंदा कोकरे, वैशाली काशिकर, अनिता पांचाळ, रेखा शिंदे, माया वाठोरे, राहीबाई चकोर, रविंद्र पडोळ, संगमेश्वर जिरगे, विश्वनाथ साखरे, सुरेश अंबोरे, शंकर काशीद, नामदेव तायडे, शेख जावेद हबीब, नितीन चव्हाण, वैजनाथ स्वामी, शामकांत पाटील, साईनाथ राठोड, महेश विभांडीक, शेषेराव फाळके, गजानन भोसीकर, रवी जाधव, आरेफ शेख, चंद्रकांत माने, वैजनाथ अजगे यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

