नांदेड (समाजहित न्यूज वृत्तांत )महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) विभागीय कार्यालय नांदेड येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रयतेचे राजे, बहुजन प्रतिपालक, महान योद्धे, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती दि.19 फेब्रुवारी 2025 बुधवार रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता तमाम एसटी कामगार-कर्मचाऱ्यांच्यावतीने मोठ्या हर्षोउल्हासात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभाग नियंत्रक डॉ.चंद्रकांत वडस्कर हे होते तर विचारपीठावर उद्घाटक म्हणून भारतीय जनता पार्टीच्या महिला राज्य मोर्चा आघाडीच्या उपाध्यक्षा सौ.प्रणीता ताई देवरे (चिखलीकर) पाटील ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून तख्त सचखंड हुजूर साहिब गुरूद्वारा लंगर साहिब नांदेडचे बाबाजी सुबेकसिंघजी महाराज, भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर, सुरेश शर्मा, शिवा सुरेश लोट, माजी सभापती सौ.संगिता पाटील डक, विभागीय कामगार अधिकारी लक्ष्मीकांत गवारे, सुरक्षा व दक्षता अधिकारी गोविंद मुळे, भांडार अभियंता सौ.वैशाली गोदमवाड, बोरगावचे सरपंच पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्वप्रथम विचारपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संयोजन समितीच्यावतीने नंदू पाटील बेंद्रीकर, अभिषेक ताकझुरे, विनोद पांचाळ, बाळू पेंटेवाड, एस.एस.सुर्यवंशी, राहुल कोकाटे, जी.डी.कळसे, गुणवंत एच.मिसलवाड, आंम्रपाली शेळकीकर यांनी सर्व मान्यवरांचे शाल, पुष्पहार देवून ह्दय सत्कार केला. यावेळी सर्व मान्यवरांची समोयोचित भाषणे झाली.शेवटी अध्यक्षीय समारोप विभाग नियंत्रक डॉ.चंद्रकांत वडस्कर यांनी करून आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदू पाटील बेेंद्रीकर यांनी केले तर सुत्रसंचालन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन अभिषेक ताकझुरे यांनी मांडले. याप्रसंगी रा.प.म. आजी-माजी कामगार-कर्मचारी व इतर समाज बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर लगेचच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राची रथातून मिरवणूक काढण्यात आली.

