सेलू (प्रतिनिधी डॉ. शिवाजी शिंदे ) आज दि. 11 फेब्रू. रोजी पोलीस स्टेशन सेलू येथे भारतीय जनता पार्टी च्या वतीने एक निवेदन देण्यात आले त्यात म्हटले आहे की, सेलूतील अनेक
सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांचा वावर वाढत आहे. त्या मध्ये अष्टविनायक मंदिर शास्त्रीनगर, साईबाबा मंदिर महेश नगर, जायकवाडी परिसर व इतर अनेक सार्वजनिक ठिकाणी अश्लील जाळे करणारे खुलेआम अश्लील चाळे करत आहेत त्यामुळे तेथील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कधी बोलायला गेल्यास ही जोडपी हमरी तुमरीवर येत आहेत. या जोडप्यां मुळे शाळेतील लहान मुलांवर वाईट परिणाम होत आहेत. तसेच देवदर्शनासाठी जाणाऱ्या नागरिकांना यांचा त्रास होत आहे आता 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे येत आहे त्यामुळे या जोडप्यांचे जास्तच पेव फुटत आहेत यामध्ये भरपूर मुली अल्पवयीन आहेत.तरी ताबडतोब या अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांचा बंदोबस्त करावा.नसता भारतीय जनता पार्टी सेलूच्या वतीने यांचा बंदोबस्त करण्यात येईल याची नोंद घ्यावी.असे निवेदन जयसिंग शेळके, नामदेव झिंबरे, नागेश ठाकूर, शिवहरी शेवाळे, अशोक शिंदे, शिवाजी राऊत, ज्ञानेश्वर फाटे, अभि ढवळे,आदी जणांनी स्वाक्षरी सहित दिले आहे.

