पंडित टोमके मराठवाडा प्रदेश अध्यक्ष रि पा इ यांनी केली बिड येथे घोषणा.
बिड (समाजहित न्यूज वृत्तांत ) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने राष्ट्रीय नेते डॉ राजेंद्र गवई यांचे आदेशानुसार दिनांक १० फेब्रुवारी २०२५ रोजी बिड येथील कार्यकर्ते यांनी शासकीय विश्राम गृह येथे जिल्हा शाखेचे प्रमुख पदाधिकारी यांची महत्व पुर्ण बैठक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जक्कपा कांबळे व पंडित टोमके मराठवाडा प्रदेश अध्यक्ष, यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली होती, या बैठकीत प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संघरक्षित ऊर्फ बाळासाहेब काकडे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बिड जिल्हा अध्यक्ष पदि नियुक्ती करण्यात आली असून या बाबतीत अधिकृत घोषणा डॉ राजेंद्र गवई राष्ट्रीय नेते यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित टोमके मराठवाडा प्रदेश अध्यक्ष यांनी भाषणातून केली तसेच नियुक्ती पत्र महाराष्ट्र अध्यक्ष जक्कपा कांबळे व पंडित टोमके मराठवाडा प्रदेश अध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आले.
बैठकीचे अध्यक्ष स्थानी जक्कपा कांबळे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हे होते, यावेळी धिरज वडमारे यांची शहर अध्यक्ष पदि नियुक्ती करण्यात आली तसेच अनेक जणांना पक्षात प्रवेश देण्यात आला तसेच सर्व आंबेडकर आणुयाई यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मुळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये सहभागी होऊन सर्वांगीण विकासासाठी पक्षाचे सभासद व्हावे व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत समाज व शासन घडवून्यासाठी प्रयत्न करत रहावे असे आवाहन पंडित टोमके मराठवाडा प्रदेश अध्यक्ष यांनी बैठकीत केले.

