सेलू (प्रतिनिधी डॉ. शिवाजी शिंदे ) जि.प.प्राथमिक शाळा फुले नगर सेलू येथे आज दि. 10 फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता फुले नगर येथील रहिवासी असलेले माजी उपनगराध्यक्ष तथा शैक्षणिक आणि समाजिक जाण असणारे जेष्ठ पत्रकार कांचन कोरडे व माजी नगर सेविका सौ.शोभाताई कोरडे या दापत्यांनी लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी रोड व्हावा म्हणून अनेकदा प्रशासकीय अधिकारी स्थानिक आमदार यांना निवेदन देणे पत्रकारांना आपल्या वृत्तमान पत्रात बातमी देणे असे अनेक प्रश्न मार्गी लावल्यामुळे लहान मुलांची होणारी होरपल लक्षात घेऊन तालुक्याच्या आमदार ना.मेघना बोर्डीकर- साकोरे यांच्या प्रयत्नांनी अखेर दहा वर्षांनी शाळेला रोड मिळाला यांचा आनंद स्थानिक रहिवासियांना झालाच होतो त्याच बरोबर कोरडे दापत्यांना पण झाला त्यामुळे त्यांनी आज दि.10 फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता आपला आनंद शाळेत शिकणाऱ्या लहान मुलां सोबत साजरा करण्याचे ठरवले आणि त्यांनी मुख्याध्यापक भुजंग थोरे सरांशी संपर्क करून त्यांची वेळ मागवून घेतली त्यानुसार एका छोटयाखांनी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार तथा सेवानिवृत ग्रंथपाल डॉ.शिवाजी शिंदे हे होते. थोरे सर यांनी सर्वांचे मनापासून स्वागत करुन कोरडे यांनी शाळेसाठी नेहमीच आपले योगदान आणि सहकार्य केल्याचे नमूद करून ते नेहमीच शाळेसाठी तन मन धनाने सहकार्य करीत असतात.त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत वृक्षारोपण,मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी मोटार पंपाची व्यवस्था अनेक कार्यात सहकार्य करतात असे सांगितले आज शाळेत लहान मुलांना खाऊ वाटप करून रोड पूर्ण झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा केला.मुलांना खाऊ वाटप केल्या बद्दल शाळेतील शिक्षक शिक्षिका यांनी आभार मानले.

