परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजता परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम राजीव भवन काँग्रेस कमिटी येथे आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सभापती काँग्रेस जेष्ठ नेते प्रल्हाद अवचार यांनी मनोगत व्यक्त केले कि,एक दूरदर्शी नेता, निर्भीड योद्धा, संस्कृतीचा संरक्षक आणि उत्तम प्रशासनाचे मूर्त रूप असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देत आहे, तसेच जेष्ठ नेते श्रीधर देशमुख यांनी सांगितले कि,छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा केवळ उत्सव नसून त्यांच्या विचारांना अंगीकारण्याची संधी आहे . तसेच जेष्ठ नेते मिन्हाज कदारी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले कि स्वराज्याची मशाल पेटवून अन्यायाविरुद्ध उभे राहिलेल्या, प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहेत छत्रपती शिवाजी महाराज, तसेच सुहास पंडित यांनी बोलले कि बहुजन हिताय, बहुजन सुखाय ही महाराजांची शिकवण आहे, ती शिकवण त्यांची प्रेरणा घेऊनच आम्ही वाटचाल करु, शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर उपस्थित मान्यवर माजी नगर सेवक शेख खाजा, अमोल जाधव दिगंबर खरवडे, शिवाजी भालेराव यांनी प्रकाश टाकला.तर सर्व पदाधिकारी यांनीही पुष्प वाहून महाराजांचा जयघोष करण्यात आला. याप्रसंगी प्रल्हाद अवचार, मिन्हाज कादारी, शाम खोबे, श्रीधर देशमुख, सुहास पंडित, शेख खाजा, दिगंबर खरवडे, मोईन माऊली, अमोल जाधव, खदिरलाला हाश्मी,सत्तार पटेल, अमोल देशमुख,वैजनाथ देवकते, शिवाजी भालेराव, काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

