परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद परभणी यांचे संकल्पनेतून जिल्हा परिषद परभणी मध्ये सेवानिवृत्त धारकांच्या सत्काराचे आयोजन दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आलेले होते. या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर यांचे हस्ते 21 सेवानिवृत्त धारकांचा निवृत्तीवेतन प्रदान आदेश देवून सत्कार करण्यात आला. वित्त विभाग व सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद परभणी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर यांनी सर्व सेवानिवृत्त धारकांना त्यांचे पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री सचिन कवठे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी साप्रवि श्री. ओमप्रकाश यादव, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री प्रकाश भोसले तसेच सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक श्री. मनोज कन्नावार, क.प्र.अ. यांनी केले तर संचालन व आभार प्रदर्शन श्री शिवाजी वटाणे, स.ले.अ. वित्त विभाग यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवनीत ब्रम्हपुरीकर कनिष्ठ लेखाधिरी यांनी परिश्रम घेतले.

