विद्यार्थीनींनी निर्भीड रहावे - पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी
February 06, 2025
0
परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) विद्यार्थीनींच्या संक्षमीकरणासाठी पोलीस अधीक्षक परभणी यांच्या कडून एक संवाद विद्यार्थीनीशी हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाव्दारे जिल्हयातील शाळा/महाविद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थीनींपर्यंत पोहचुन त्यांच्याशी संवाद साधला जात आहे. हा संवाद परभणी पोलीस दलाचे भरोसा सेल तसेच पोलीस काका, पोलीस दिदी असणारे पोलीस स्टेशनचे अंमलदार त्यांच्याव्दारे प्रत्यक्ष साधला जात आहे. यामध्ये पोलीस अधीक्षक, परभणी यांनी मुंबई येथील जाणीव या संस्थेचे मिलींद पोंक्षे व गौरी संख्ये यांना संवादासाठी मार्गदर्शक वक्ते म्हणुन बोलावुन त्यांच्याव्दारे विद्यार्थीनींचे प्रबोधन केले जात आहे. विद्यार्थीनींना त्यांच्या सोबत होणाऱ्या छेडछाड घटना व GOOD TOUCH BAD TOUCH या बद्दल माहिती देवून त्यांना कसे सामोरे जावे तसेच सामाजिक माध्यमावर व्यक्त होतांना काय खबरदारी बाळगावी या बद्दल उपयुक्त मार्गदर्शन केले जात आहे. आज दि.०६/०२/२०२५ रोजी जिल्हयातील बोरी येथील जिल्हा परीषदच्या केंद्रीय शाळेत विद्यार्थीनींकरीता एक संवाद विद्यार्थीनींशी हा कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिह संतोषसिंह परदेशी यांनी उपस्थित राहुन विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थीनींना निर्भीड रहावे व त्यांच्या संरक्षणासाठी परभणी पोलीस सदैव तयार आहेत असे आश्वासन दिले. सदर प्रसंगी विद्यार्थीनी, शिक्षक व पालकवर्ग मोठ्या संख्येने हजर होते.

