डोंबिवली (कार्यकारी संपादक ऍड. सुभाष अंभोरे) दिनांक 26 फेब्रुवारी रोजी दिवंगत अंकुश गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या डोंबिवली शहर युवा कार्याध्यक्षपदी दिवंगत अंकुश गायकवाड डोंबिवली शहराध्यक्ष यांचे पुतणे रवि गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली तसेच दिवंगत अंकुश गायकवाड यांच्यासह डोंबिवली शहर उपाध्यक्ष म्हणून काम केलेले ॲड. सुभाष अशोकराव अंभोरे यांची डोंबिवली शहर युवा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. रिपाइं आठवले पक्षाचे ठाणे प्रदेश उपाध्यक्ष तथा कल्याण डोंबिवली झोपडपट्टी महासंघ अध्यक्ष माणिकराव उघडे व डोंबिवली युवा शहराध्यक्ष विकास खैरनार यांनी केलेल्या शिफारसी वरून सदर नियुक्ती कल्याण डोंबिवली युवा जिल्हा अध्यक्ष ॲड. संग्राम बाबा मोरे यांनी केली. तसेच त्यांचा हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
सर्व प्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार घालून अभिवादन करण्यात आले. माणिकराव उघडे, ॲड. संग्राम मोरे, विकास खैरनार तसेच ॲड. दयानंद घोडेराव यांना पुष्प गुच्छ व शाल देऊन त्यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला.
या वेळी माणिकराव उघडे म्हणाले की, या कल्याण डोंबिवली मध्येच नव्हे तर संपूर्ण देशात रिपब्लिकन चळवळीची मोठी ताकद आहे परंतु ती विखरलेली असल्यामुळे अपेक्षित शक्ती दिसत नाही. या पुढे रिपब्लिकन ऐक्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. त्याची सुरवात कल्याण डोंबिवली पासून सुरू करत असून रिपब्लिकन चळवळीमध्ये सर्व कल्याण डोंबिवली मधील पुढाऱ्यांनी तसेच नागरिकाने सामील व्हावे असे आव्हान केले आहे. तसेच समाजाच्या हितासाठी पक्षातील सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन काम करावे असे आवाहन देखील केले. रिपब्लिकन ऐक्याचा भाग म्हणून डोंबिवली युवा आघाडीचे पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी मी जिल्हाध्यक्ष ॲड. संग्राम बाबा मोरे यांना शिफारस केली आहे. ॲड. संग्राम मोरे यांच्या बद्दल बोलतांना त्यांना असे सांगितले की, ॲड. संग्राम मोरे यांचे वडील बाबा मोरे आणि रिपाइं आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्य मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचे अत्यंत घनिष्ट संबंध होते. त्यांच्या घरी आठवले साहेबांचे नेहमी येणे जाणे असायचे एका कुटुंबातील सदस्या प्रमाणे त्यांची एकमेकांबद्दल आपुलकी होती. बाबा मोरे हे डॅशिंग पॅंथर होते त्यांनी संपूर्ण आयुष्य भर समाजाच्या न्याय हक्कासाठी आक्रमकपणे संघर्ष करत लढा दिला. असे माणिकराव उघडे यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.
तर युवा जिल्हाध्यक्ष ॲड. संग्राम मोरे हे असे म्हटले की, पक्षाच्या युवा जिल्हा अध्यक्ष पदाची धुरा स्वीकारल्या पासून युवक आघाडीचे संघटन वाढवण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न केले. संपूर्ण जिल्हा पिंजून काढत एक मोठी युवाशक्ती कल्याण डोंबिवली जिल्ह्यामध्ये मी निर्माण केलेली आहे. डोंबिवली शहरातील भूमिपुत्र असलेले समाजसेवक लोकनेते दिवंगत अंकुश गायकवाड यांचे पुतणे रवि गायकवाड यांना युवा आघाडीचे डोंबिवली शहर कार्याध्यक्ष पदी तर आमचे वकिल बंधू असलेले ॲड. सुभाष अंभोरे यांची युवा सचिव पदी नियुक्ती करत असताना मला अत्यंत आनंद होत आहे. आपण सर्व मिळून या डोंबिवली शहरातील प्रत्येक प्रभागात शाखा निर्माण करून युवक आघाडीची बांधणी करून एक नवीन मोठी युवाशक्ती निर्माण करू असे आवाहन केले व नवनिर्वाचित युवा कार्याध्यक्ष व युवा सचिव यांना पुढील सामाजिक कार्यासाठी व वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
रिपाइं आठवले पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख तुकाराम पवार यांनी रिपाइं पक्षाचे उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या कार्या बद्दल समाधान व्यक्त केले. नवनिर्वाचित कार्याध्यक्ष रवि गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की, माझे काका दिवंगत अंकुश गायकवाड यांच्या निधनानंतर त्यांचा सामाजिक व राजकीय वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी अंकुश गायकवाड यांचे निधन झाल्यापासुन डोंबिवली शहर अध्यक्ष पदाची वरिष्ठ पदाधिकारी यांच्याकडे मागणी केली होती. त्याबाबत वरिष्ठ पदाधिकारी हे सकारात्मक होते परंतू पक्षाचे काही लोकांनी मला शहर अध्यक्ष हे पद मिळू नये यासाठी प्रयत्न केला. ज्यांच्या पदाच्या निवडणुकीत माझे काका अंकुश गायकवाड यांनी त्यांना निवडून देण्यासाठी मोठा संघर्ष केला तेच काही लोकं मला पक्षात कुठलच पद भेटू नये यासाठी प्रयत्न करत होते. परंतु आज मला डोंबिवली शहर युवा कार्याध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले आहे म्हणून या नियुक्तीला असामान्य असे महत्व आहे. पक्षातील काही प्रभावी लोकांनी माझ्यावर अन्याय केला तर माणिकराव उघडे साहेबांनी मला पद देण्यासाठी यशस्वी प्रयत्न करून मला खरा न्याय दिला असे आपले मत मांडले. तसेच शहर कार्याध्यक्षाची माझ्या वर जवाबदारी दिल्याने पुढील काळामध्ये या डोंबिवली शहरात युवकाच मोठ्याप्रमाणात संघटन निर्माण करून मा. ना. रामदासजी आठवले साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे करू असे आश्वासन दिले.
या वेळी नवनिर्वाचित युवा सचिव ॲड. सुभाष अंभोरे यांनी माणिकराव उघडे व ॲड. संग्राम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा शहर अध्यक्ष विकास खैरनार तसेच नवनिर्वाचित कार्याध्यक्ष रवि गायकवाड यांच्या सह लवकरच डोंबिवली शहरामध्ये युवक मेळावा आयोजित करणार असून या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात युवा उपस्थित राहणार आहेत अशी त्यांनी माहिती दिली. नवनिर्वाचित दोन्ही पदाधिकारी यांनी नियुक्ती केल्या बद्दल माणिकराव उघडे, ॲड. संग्राम मोरे, विकास खैरनार वयांचे आभार मानले. तसेच माणिकराव उघडे यांच्या कडे या नियुकीसाठी शिफारस करणारे मीनाताई साळवे, वसंत टेकाळे, तुकाराम पवार, समाधान तायडे, गौतम वाकचौरे, मंगेश कांबळे, भास्कर शेळके आदींचे सुद्धा आभार मानले.
यावेळी रिपाइं आठवले पक्षाचे ठाणे प्रदेश उपाध्यक्ष तथा झोपडपट्टी कल्याण डोंबिवली अध्यक्ष माणिकराव उघडे, रिपाइं आठवले युवा जिल्हा अध्यक्ष ॲड. संग्राम मोरे, जिल्हा संघटक वसंत टेकाळे, जिल्हा संपर्क प्रमुख तुकाराम पवार, महिला जिल्हा अध्यक्ष मीनाताई साळवे, युवा शहर अध्यक्ष विकास खैरनार, ज्येष्ठ नेते समाधान तायडे, नवनिर्वाचित युवा कार्याध्यक्ष रवि गायकवाड, नवनिर्वाचित युवा सचिव ॲड. सुभाष अंभोरे, ॲड. दयानंद घोडेराव, गौतम वाकचौरे, प्रमिलाताई सावंत, माजी शहर कार्याध्यक्ष सतीश पवार, मंगेश कांबळे, तुषार शेळके, भास्कर शेळके आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नवनिर्वाचित कार्याध्यक्ष व सचिव यांना नियुक्ती बद्दल शुभेच्छा दिल्या.







