परभणी, दि.25 (समाजहित न्यूज वृत्तांत) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील लोकांचे राहणीमान उंचावणे व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांच्या स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधून देण्यासाठी रमाई घरकुल आवास योजना (ग्रामीण व शहरी) राबविण्यात येत आहे. इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी आपल्या तालुक्याचे गट विकास अधिकारी, पंचायत समिती या कार्यालयाकडे आवश्यक कागदपत्रासह परिपुर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गिता गुट्टे यांनी केले आहे. लाभार्थीसाठी आवश्यक कागदपत्रं- 7/12 चा उतारा, मालमत्ता नोंदपत्र (प्रॉपर्टी रजिीस्टर्ड कार्ड) ग्रामपंचायतीतील मालमत्ता नोंदवहीतील उतारा यापैकी एक. घरपटटी, पाणीपटी, विद्युत बिल या कागदपत्रापैकी एक. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकीत प्रत. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला. अतिरिक्त दाखले : खाली नमुद केलेली कागदपत्रे / दाखले पुरावे म्हणून ग्राहय धरण्यात येतील :- दिनांक 1-1-1995 च्या किंवा मतदार यादीतील नावाचा उतारा. निवडणुक मतदार ओळखपत्र. रेशनकार्ड. सरपंच/तलाठ्याचा दाखला. जिल्हयाचे तालुकानिहाय उदीष्ट -- सन 2024-25 या वर्षाकरीता परभणी जिल्हयाकरीता एकूण 3908 घरकुलाचे उदिष्ट आहे. सदर उदिष्ट गट विकास अधिकारी, पंचायत समिती परभणी- 500, मानवत-300, गंगाखेड-350, सोनपेठ-350, सेलू-550, जिंतूर -950, पुर्णा -270, पाथरी -258, पालम-380.

