सेलू (प्रतिनिधी डॉ. शिवाजी शिंदे )सेलू येथील सार्वजनिक शिव जन्मोत्सव समितीच्या वतीने छत्रपतीशिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवाजी राजांच्या जिवन चरित्रावर आधारीत रविवार दि. 16 फेब्रुवारी रोजी आयोजित तालुका स्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेत तालुक्यातील विविध शाळा-महाविद्यालयातील व सर्व जाती धर्मातील 2000 विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त व उदंड प्रतिसादातून राष्ट्रीय एकात्मता व धार्मिक सहिष्णूतेचे प्रतिबिंब उमटले. येथील नूतन विद्यालय व केशवराज बाबासाहे ब विद्यालय अशा दोन केंद्रावर वर्ग 5वी ते 6वी, 7 वी ते 8वी व 9वी ते 12 वी अशा तीन गटात आयोजित सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या.माहिती आणि तंत्रज्ञानाच्या काळात सध्यास्थितीत मोबाईल च्या आहारी गेलेल्या व वाचनापासून दुरावत चाललेल्या शालेय विद्यार्थ्यांना पुन्हा वाचनाच्या प्रवाहात आणून त्यांच्या मनात स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण करण्यासाठी शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विचार व कार्यावर आधारित या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या परीक्षा यशस्वी करण्या साठी केंद्र संचालक म्हणून विलास खरात, रामराव गायकवाड, किरण जाधव तानाजी भोसले, रामराव बोबडे यांनी काम पाहिले. तालुक्यातील विविध शाळांमधील 100 शिक्षकांनी पर्यवेक्षक म्हणून उत्स्फूर्तपणे पर्यवेक्षण कार्यात सहभाग नोंदवला. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या डासाळा , रवळगाव, चिकलठाणा वालूर, मोरेगाव, CPS कन्या, CPS सेलू या केंद्रातील विविध शाळा तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या यासेर उर्दु, डॉ झाकिर हुसेन विद्यालय,नूतन विद्यालय, नूतन कन्या, यशवंत विद्यालय, के बा विद्यालय, न्यू हायस्कूल, शारदा विद्यालय, ज्ञानतिर्थ विद्यालय, नितीन माध्य विद्यालय , नूतन महाविद्यालय,यशवंत महाविद्यालय,स्वामी विवेकानंद शाळा, विद्यानिकेतन शाळा अशा विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.स्पर्धा परीक्षा यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष गोविंद काष्टे,उपाध्यक्ष अप्पूसेठ सोळंके ,
सचिव रामेश्वर शेरे , प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी,मुख्याध्यापक सर्जेराव लहाणे , पर्यवेक्षक रोहीदास मोगल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत देशमुख, आत्माराम हारकळ, सुरेश कवडे, गणेश माळवे,सुभाष मोहकरे, किरण खरात, नरेश पाटील, योगेश ढवारे , सर्जेराव सोळंके, रणजीत गायके, दतात्रय यादव, सिध्देश्वर मुरकुटे , बाबासाहेब काष्टे, मुकुंद सोळंके आदींनी परिश्रम घेतले.विजेत्या स्पर्धकांना19फेब्रुवारी शिवजयंतीदिनी रोख पारितोषिके , सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

