परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ मा.श्री. रविंद्रसिंह परदेशी पोलीस अधिक्षक परभणी यांनी परभणी जिल्हयात झालेल्या जबरी चोरी चे गुन्हे उघडकीस आणून आरोपी अटक करणे बाबत पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा परभणी याना आदेशीत केले होते. दिनांक १५/०२/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास पोस्टे ताडकळस गुरन २५८/२०२४ कलम १०३(१),१८९(२),१८९ (४),१९१(२),१९१(३),१९० भारतीय न्याय संहीता या गुन्हयातील फरार आरोपी नामे मुंजा तुकाराम कहाते रा पिंप्री देशमुख ता. जि.परभणी हा त्याचे साथीदारासह गंगाखेड येथे येणार असल्याची माहीती मिळाली असता तहसील कार्यालय समोर सापळा लावून थांबलो असता मोठ्या शिताफीने आरोपी नामे मुंजा तुकाराम कहाते वय २१ वर्षे रा पिंप्री देशमुख ता. जि.परभणी व सोबत साथीदार केशव बाबुराव जरतारे वय २० वर्षे रा. मुघट ता. मुदखेड जि. नांदेड यास ताब्यात घेतले. सदर आरोपीतांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी पोस्टे ताडकळस गुरन २६/२०२५ कलम ३०९ (६), १२६ (२), ३(५) भान्यासं व पोस्टे चुडावा गुरन ०५/२०२५ कलम ३०९(६), ३(५) भान्यासं गुन्हे त्यांचा साथीदार अजिंक्य जगताप यांचे सह केल्याचे मान्य केले. सदर आरोपीतांना पुढील कारवाई कामी पोस्टे चुडावा येथे हजर करण्यात आले आहे. पुढील तपास श्री. समाधान पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी पुर्णा हे करीत आहेत. सदरची कार्यवाही मा.श्री. रविंद्रसिंह परदेशी पोलीस अधिक्षक परभणी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. यशवंत काळे अपर पोलीस अधीक्षक परभणी यांचे नेतृत्वात श्री. विवेकांनद पाटील पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांचे पथकातील सपोनि श्री. भारती, पोउपनि वाघमारे, पोउपनि चंदनसिंह परीहार पोलीस अंमलदार रंगनाथ दुधाटे, सचिन भदर्गे, विलास सातपुते, लक्ष्मण कांगणे, राहुल परसोड, सिध्देश्वर चाटे, हनुमान ढगे, राम पौळ, नामदेव डुबे, परसराम गायकवाड, दिलीप निलपत्रेवार, उत्तम हनवते, संजय घुगे व सायबर कक्षाचे गणेश कीटकर, बालाजी रेड्डी यांनी मिळून केली आहे.
खून, जबरी चोरी करणारे कुङ्ख्यात दोन आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सापळा रचून आवळल्या मुसक्या
February 17, 2025
0
Tags

