परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी विशेष वार्षिक युवती शिबिर-२०२५ अंतर्गत आयोजित मोफत ॲनिमिया व थेलेसेमिया तपासणी शिबिरात महालॅब परभणी, जिल्हा समन्वयक, सिद्धार्थ सोनकांबळे, एच.एन.एल.लॅब समन्वयक, कृष्णकांत ढाकरगे, राहुल अग्रवाल, नौशाद पटेल आणि सहकारी यांचे विशेष योगदान लाभले. या शिबिरात शिबिरार्थींनिसह मौजे. पारवा मधील पुरुष, महिला, शालेय शिक्षक, शिबिरार्थी आदींची मोफत रक्तक्षय तपासणी करण्यात आले. परभणी रासेयो शिबिरात आयोजित मोफत रक्तक्षय तपासणी शिबिरात अमोल गाडे मंचावर बोलत होते. व्यासपीठावर मा. श्री.कैलास सुरवसे, रासेयो परभणी जिल्हा समन्वयक, प्रा. अरुण पडघन, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ.नसीम बेगम सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ.संगीता लोमटे, प्रा.पीडी यादव, उपस्थित होते.शिबिरात एकुण ८५ लाभार्थींना लाभ घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी शिंदे यांनी केले तर आभार हर्षदा शिंदे हिने मानले.

