परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या रा. से. यो.विशेष वार्षिक युवती शिबिर-२०२५ डिजिटल साक्षरतेसाठी युवा या थीम अंतर्गत दि. २८/०१/२०२५ मंगळवार रोजी दुपारी २:३० वाजता परभणी जिल्ह्यातील मौजे. पारवा येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात "ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहकांचे हक्क" यावर सविस्तर माहिती ग्राहक पंचायतचे देवगिरी प्रांत अध्यक्ष डॉ.विलास मोरे यांच्यामार्फत देण्यात आली. यावेळी ग्राहक पंचायतचे देवगिरी प्रांत अध्यक्ष डॉ. विलास मोरे, शिक्षण समिती प्रमुख डॉ. संगीता आवचार, परभणी जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत मा. श्री. गुलाबराव शिंदे, गंगाधर कान्हेकर, भानुदास शिंदे, गफार भाई, प्रल्हादराव टाकरस, श्याम रेगाटे, विश्वनाथ थिके, सोपानरावजी मोहिते, यांच्यासह ग्राम पंचायतचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयाचे प्राध्यापकवृंद, कर्मचारी,रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नसीम बेगम, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. संगीता लोमटे, पि.डी.यादव, शालेय शिक्षक, विद्यार्थिनी व शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. विलास मोरे, डॉ. संगीता अवचार, श्री गुलाबराव शिंदे व गंगाधर कान्हेकर यांनी ग्राहकांचे संरक्षण कायदा व हक्क याविषयी यथोचित असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा.से.यो.स्वयंसेवीका राजनंदिनी देंगे यांनी केले. तर आभार पी.डी.यादव यांनी केले.


