परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) परभणीतील कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष वार्षिक युवती शिबिर मौजे.पारवा येथे आयोजित करण्यात आले असून सोमवारी नु. वि. मं. शि. संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.हेमंतराव जामकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या शिबिराचे उद्घाटन नु.वि.मं.शि.संस्थेचे सचिव मा.श्री.विजयराव जामकर साहेब यांच्या हस्ते झाले. या शिबिरास प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत भोसले उपस्थित होते. यावेळी प्रमुख उपस्थितीत संस्था संचालक मा. श्री. संग्राम जामकर, उपप्राचार्या डॉ.संगीता आवचार व रा.से.यो. परभणी जिल्हा समन्वयक, प्रा.अरूण पडघन, सरपंच, मा.श्री.रमेश मुंजाजी सावळे, पोलीस पाटील मा. श्री. ज्ञानेश्वर वैजनाथराव सोळंके, ग्रामसेवक मा. श्री. अंगदराव दुधाटे, मुख्याध्यापक मा. श्री. भिमराव साळवे, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.नसीम बेगम, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी पी.डी.यादव, ग्रामपंचायत सदस्य, प्राध्यापकवृंद, शिक्षक वर्ग, विद्यार्थी ग्रामस्थ व शिबिरार्थी उपस्थित होते.

