उमरी येथील उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांच्या मदतीला धावली वंचित बहुजन आघाडी
परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) उमरी माळ्याची ता. जि परभणी येथील सचिन दत्तराव कांबळे यांची रमाई योजने अंतर्गत घरकुलाचे बांधकाम न करू दिले व घरकुलास आडथाळा आणल्या प्रकरणी ग्रामपंचयात कार्यालय व ग्रामसेवक अधिकारी यांच्या विरोधात तसेच 15 व्या वित्त वायोगातील व खासदार फंडातील व जिल्हा परिषद विभाग पाठबंधारे जिल्हा नियोजन 2022-2023 या कडून बंधारा खोलीकरन व बांधकाम करण्यात आलेले आहे या काममध्ये जास्त प्रमानात भ्रष्टाचार झालेला असल्याचा आरोप करत उमरी माळ्याची ग्रामपंचायत कार्यालया समोर सचिन कांबळे, सिद्धार्थ कांबळे यांचे प्राणांतिक बेमुदत आमरण उपोषनास बसले आहेत. या उपोषणास वंचित बहुजन आघाडी जिल्हा परभणी च्या वतीने आज दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासंदर्भात आश्वासन दिले आहे. जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी आपल्या पाठीशी आहे असे आश्वासन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा अध्यक्ष सुनील मगरे जिल्हाध्यक्ष तुकाराम भारती यांच्या वतीने उपोषणकर्त्यास देण्यात आले आहे. भेटीदरम्यान उपोषण कर्ते सचिन कांबळे यांची तब्येत खालावल्याने त्यांच्या छातीत व डोक्यात दुखत असल्याने चक्कर येऊन पडले त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सदरील उपोषण कर्ते सचिन कांबळे यांना तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊन स्वतः त्यांना परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावरूनच वंचित बहुजन आघाडी ही राजकारणीपेक्षा समाजसेवा, अन्यायाविरुद्ध न्याय मिळवून देण्यासाठी, गोरगरीब गरजू कष्टकरी शेतकरी यांच्या पाठीशी उभे राहून नेहमीच जनतेच्या सेवेसाठी तत्पर असते हे सिद्ध करून दिले आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्हा अध्यक्ष ( दक्षिण) सुनील मगरे, जिल्हाध्यक्ष (उत्तर ) तुकाराम भारती, परभणी तालुका अध्यक्ष(दक्षिण) कमलेश ठेंगे, परभणी तालुका अध्यक्ष (उत्तर) प्रमोद अशोकराव अंभोरे, तालुका उपाध्यक्ष यशवंत सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष गणेश गाढे, तालुका महासचिव राहुल पवळे व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

