सेलू (वार्ताहर युनूस कच्ची )शहरातील रहिवाशी संतोष प्रकाश पवार वय 23 वर्ष हे मागील अडीच महिन्यांपासून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह डीग्रसवाडी शिवारातील खदानीतुन लोखंडी जाळीत दगड ठेवलेल्या असवस्थेत 14 जानेवारी रोजी पोलिसांनी बाहेर काढला. या प्रकरणाचा सीआयडीमार्फत तपास करून दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. मयत संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी मयत संतोष पवार यांच्या आई धोंडाबाई प्रकाश पवार यांनी आज शनिवार 25 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

