समाज कल्याण विभागातील 1)मा. वशिष्ठ मस्के, वरिष्ठ लिपिक, 2) मा. एच. ए. सय्यद, समाज कल्याण निरीक्षक, व वित्त विभाग येथील 3) मा.धम्मदीप भराडे, कनिष्ठ लेखा अधिकारी वित्त विभाग या तीन रत्नांना सन्मानित
परभणी ( समाजहित न्यूज वृत्तांत ) महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा या मिनी संसद म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील ग्रामीण विभागाच्या विकासाबरोबरच अनेक कल्याणकारी योजना या जिल्हा परिषदा मार्फत राबविला जातात. याच पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा परिषदेतील कर्तव्यदक्ष, दूरदृष्टी ठेवून कार्य करणारे, संविधानाप्रती जनजागृती करणारे, जिल्हा परिषदेमार्फत रविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम करणारे तसेच आपल्या शासकीय नोकरीत जबाबदारीने सेवा देणारे तसेच समाजातील विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय कार्यात सक्रिय सहभाग घेणारे जिल्हा परिषद परभणीतील अधिकारी त्रिमूर्ती असे तीन रत्न समाज कल्याण विभागातील दोन 1)मा. वशिष्ठ मस्के, वरिष्ठ लिपिक, 2) मा. एच. ए. सय्यद, समाज कल्याण निरीक्षक, व वित्त विभाग येथील एक 3) मा.धम्मदीप भराडे, कनिष्ठ लेखा अधिकारी वित्त विभाग या तीन रत्नांना त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संविधान दिनाच्या औचित्य साधून रुग्णहक्क संरक्षण समिती आयोजित "राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार 2024" हा पुरस्कार दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी येथिल पत्रकार भवन येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा शाखा परभणी च्या वतीने परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांनी केले होते. हा पुरस्कार सोहळा दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी परभणी शहरातील एसपी ऑफिस समोरील पत्रकार भवन येथे पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इंजि. आर.डी.मगर हे होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सत्ता इनामदार, ऍड.निलेश करमोडी, हनुमंत गोत्राळ, शिवाजीराव चव्हाण, रेणुकाताई बोरा, अनिताताई सरोदे, हाजी शरीफ शेख, खदीरलाल हाश्मी, शरीफ चारठाणकर, तब्बू पटेल, प्रमोद कुटे, प्रमोद अंभोरे, महबूब शेख, वाजिद खान पठाण, शिवशंकर सोनवणे हे होते.
हा "राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार 2024" या जिल्हा परिषदेतील तीन रत्नांना मिळाल्याबद्दल परभणी जिल्ह्यासोबतच जिल्हा परिषदेची ही मान उंचावण्याचं काम केले आहे.

