यवतमाळ (समाजहित न्यूज वृत्तांत)जिल्ह्यासह महाष्ट्रभर सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या रुग्णहक्क संरक्षण समिती संस्था महाराष्ट्रच्या वतीने ३० नोव्हेंबर २०२४ ला राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार आयोजित करण्यात आला होता. यात मा.सौ.मनिषाजी तिरणकर, राज्याध्यक्ष अखिल भारतीय महिला संवैधानिक हक्क परिषद यांना या पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर रुग्णांच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्या हितासाठी कार्य करणारी सामाजिक संस्था, रुग्णहक्क संरक्षण समिती महाराष्ट्र जिल्हा परभणीच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, आरोग्य, सांस्कृतिक, पत्रकारिता, बचतगट, क्रीडा, इत्यादी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 34 समाज सेवकांचा संविधान सन्मान गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. सौ.तिरणकर ह्या अ.भा. महिला संविधानिक हक्क परिषदेच्या राज्याध्यक्षा, महाराष्ट्र राज्य नॅशनल चाईल्ड एंड वुमन डेव्हलपमेंट कौन्सील न्यू दिल्ली व्हाईस प्रेसिडेंट महाराष्ट्र राज्य, नॅशनल एन्टी करप्शन एंड आपरेशन कमिटी ऑफ ईंडिया जिल्हाध्यक्ष यवतमाळ, भारतीय नारी रक्षा संघटना, यवतमाळ अश्या विविध सामाजिक संघटनेच्या पद भुषवीत आहेत. आदिवासी आणि बहुजन समाजात त्यांचे सामाजिक अलौकिक कार्य असुन त्यांनी समाजातील पिडीत महीलांना न्याय मिळवुन देण्यासाठी निर्भिड भुमिकेने कार्य चालविले.
समाज ऊत्थानासाठी चळवळीची महीला परिषद, पोलीस बांधवांच्या हक्कासाठी पुढाकार घेत असत. मनिषा तिरणकर यांनी मानवी हक्काची झेप घेवुन "स्त्री" ही राजकारणात सशक्त व्हावी म्हणुन श्रीमंत बलाढ्य शक्तिंच्या विरोधात नगराध्यपदाची निवडणुक लढविली. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा शाखा परभणी च्या वतीने परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांनी केले होते. हा पुरस्कार सोहळा दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी परभणी शहरातील एसपी ऑफिस समोरील पत्रकार भवन येथे पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इंजि. आर.डी.मगर हे होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सत्ता इनामदार, ऍड.निलेश करमोडी, हनुमंत गोत्राळ, शिवाजीराव चव्हाण, रेणुकाताई बोरा, अनिताताई सरोदे, हाजी शरीफ शेख, खदीरलाल हाश्मी, शरीफ चारठाणकर, तब्बू पटेल, प्रमोद कुटे, प्रमोद अंभोरे, महबूब शेख, वाजिद खान पठाण, शिवशंकर सोनवणे हे होते. हा "राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार 2024" सौ. मनीषाजी तिरणकर यांना मिळाल्या बद्दल त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून अभिनंदन चा वर्षाव होत आहे


