परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 साठी कार्यक्रम दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहीता अंमलात आलेली आहे. त्यामुळे परभणी तालुक्यातील विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन तालुक्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये, किंवा शैक्षणीक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निर्बंध घालणे आवश्यक आहे. त्याकरीता परभणी उपविभागीय दंडाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी (परभणी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक) दत्तु शेवाळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहीता 2023 चे कलम 163 अन्वये तालुक्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये, किंवा शैक्षणीक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यत निर्बंध घातले असल्याचे आदेश दिले आहेत.
धार्मिक स्थळे, रुग्णालये, किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध
October 17, 2024
0

.jpeg)