नागपूर येथील दिक्षा भुमी येथे दिनांक 12/10/2024 रोजी रात्री धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला पंडित टोमके मराठवाडा प्रदेश अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी अभिवादन केले तसेच रि पा इं चे सुनील शिंदे जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद, नारायण वाघमारे जिल्हा अध्यक्ष परभणी, किशन तुपसुंदर तालुका अध्यक्ष, सुरेश मगरे धम्म उपासक, यांच्या सह ऊपासीका व तरुण, अबालवृद्ध, बालक, बालिका उपस्थित होते.यानंतर पंडितराव टोमके यांनी पर्यटकांची पर्वणी असलेल्या मध्यप्रदेशातील विदिशा येथुन जवळच असलेल्या,जगप्रसिध्द साॅंची स्तूप स्थळाला दिनांक 14/10/2024 रोजी सकाळी भेट देऊन पाहणी करून पर्यटनाच्या दृष्टीने मनमुराद आनंद लुटला भारत देशाच्या 200 रुपये चलनाचे नोटांवर या सॉंची स्तूपाचे छायाचित्राचा समावेश भारत सरकारने केला आहे या ठिकाणी एकूण 47 चैत्यस्तुप एकरुप होऊन पाहिले तसेच सॉंची स्तूप परिसरात असलेल्या व श्रिलंका महाबोधी सोसायटीच्या वतीने बांधलेल्या चेतियगिरी बुद्ध विहारात जाऊन बुद्ध वंदना, पंचशील,त्रिशरण,पठण केले या ऐतिहासिक विहाराचे ऊदघाटन सन 1952 साली तात्कालिक पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते. दिनांक 15/10/2024 रोजी दुपारी ताजमहाल आग्रा उत्तर प्रदेश याठिकाणी भेट देऊन ताजमहाल येथील शहाजहान बादशहाने आपल्या पत्नी बीबी च्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी अजुबा बनवला आहे यमुना नदीच्या तीरावर असलेले हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचे आहे.

