मुंबई (कार्य.संपादक ऍड. सुभाष अंभोरे) राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवली संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय डोंबिवली या शाळेतील विद्यार्थी कु. श्रेयश सुभाष अंभोरे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ अंतर्गत ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये पुन्हा सुवर्णपदक पटकावले आहे, यापूर्वी कु. श्रेयशने वर्ल्ड तायक्वांदो असोसिएशन, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन, महाराष्ट्र राज्य तायक्वांदो असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या जागतिक दर्जाच्या तायक्वांदो (२०२४) स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक प्राप्त केले होते व त्यानंतर महाराष्ट्र राज्य स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त करून रौप्यपदक पटकावले होते. सालाबाद प्रमाणे याही वर्षी ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी आयोजित केलेल्या ठाणे जिल्हास्तरावरील शालेय तायक्वांदो स्पर्धा २०२४ मध्ये कु.श्रेयश अंभोरे यांनी चमकदार कामगिरी करत एक हाती स्पर्धा जिंकत पुन्हा सुवर्णपदक पटकावले आहे. कु.श्रेयश अंभोरे यांनी सदर सुवर्णपदक १७ वर्ष वयो गट खालील व ३८ ते ४१ वजन गटांमध्ये खेळत प्राप्त केले आहे. सदर स्पर्धा ही दिनांक २१ ऑक्टोबर २०२४ रोजी के. एम. अग्रवाल कॉलेज गंधारी रोड कल्याण, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे या ठिकाणी आयोजित केली गेली होती. कु. श्रेयश हा ऍड. सुभाष अशोकराव अंभोरे यांचा मुलगा असून सुभाष अंभोरे हे माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ या सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) या पक्षाचे डोंबिवली शहर उपाध्यक्ष आहेत. कु. श्रेयश यांनी केलेल्या चमकदार कामगिरी बद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे तसेच त्याच्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. ऍड. सुभाष अंभोरे यांनी कु.श्रेयशला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

