परभणी ( समाजहित न्युज वृतांत) शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी मेट्रो ब्लड बँक येथील कर्तव्यदक्ष कार्यक्षम बी.डी.एस.ओ. कर्मचारी सचिनभाऊ पवार यांचा आज दिनांक 10 जून रोजी परभणी मेट्रो ब्लड बँक येथे लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ, समाजहित अभियान प्रतिष्ठान, रुग्ण हक्क संरक्षण समिती, दयावान सरकार महाराष्ट्र राज्य, भीमा कोरेगाव मित्र मंडळ आदी संघटनांच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात आला. सचिनभाऊ पवार हे गेल्या काही वर्षांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात येत असलेल्या गरीब, गरजू रुग्णांसाठी अहोरात्र परिश्रम करून रुग्ण सेवा करत असतात. गरजू रुग्णांसाठी वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्यासाठी अग्रेसर असतात. तसेच ब्लड बँकेत रक्त पुरवठा उपलब्ध नसल्यास रक्तदान करण्याचे आवाहन वेळोवेळी जनतेला करून ब्लड कॅम्प लावून हा रक्त तुटवडा दुर करण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा या कर्तृत्वान व्यक्तिमत्व असलेल्या सचिनभाऊ पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. या वेळी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघचे परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, जिल्हा सचिव तथा संस्थापक अध्यक्ष समाजहित अभियान प्रतिष्ठान प्रमोद अंभोरे, रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज, भीमा कोरेगाव मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीप वायवळ, समाजहित न्युज चॅनल चे व्यवस्थापक प्रतिनिधी शेख अझहर तसेच ब्लड बँक कर्मचारी बी. डी. एस. ओ.अनिल सावंत, किशोर जाधव, दीपक कंडीरे, आत्माराम जटाळे, माधव गोचळे, विठ्ठल शिंदे आदींची उपस्थिती होती. वाढदिवस साजरा केल्या बद्दल सचिनभाऊ पवार यांनी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ चे आभार मानले आहे.
संस्थापक संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

