येत्या २४ तारखेला आंतरवाली सराटी येथे सकाळी १० वाजता मराठा समाजाची विशेष बैठक श्री. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. निर्णायक सभेच्या अनुषंगाने आयोजित या बैठकीला आपणासह आपल्या जिल्ह्यातून, तालुक्यातून व गावातून अगदी शेवटचा समाज बांधव देखील बैठकीला आला पाहिजे. या साठी सर्वांना वेळात वेळ काढून कॉल करा. ही जिम्मेदारी मनानेच घ्या व ही मराठ्यांची बैठक रुबाबात झाली पाहिजे या साठी प्रामाणिक प्रयत्न करा. भविष्यात मराठा म्हणून मान उंचावून जगायचे असेल तर मात्र आता आपली ताकद दाखवण्याची खरी गरज आहे. बाकी आपण सुज्ञ आहातच. श्री.मनोज दादा जरांगे पाटील जाती साठी कायम प्रामाणिक राहिले आहेत आणि भविष्यातही राहणार आहेत, हे सांगण्याची गरजच पडणार नसून ते कोट्यावधी मराठ्यांना चांगलेच अवगत आहे. आता आपण सुद्धा आपले कर्तव्य समजून ती जबाबदारी आपण ईमानदारीने पार पाडण्याची संधी आलेली आहे. सर्वांना परत एकदा मनापासून विनंती आहे की, कोणाच्या फोनची व आमंत्रणाची वाट पाहू नका. कोणतेही कारण न सांगता, उत्साहाने येण्याची गरज आहे. खुपजण येणार आहेत, मी नाही गेलो तर काय फरक पडणार आहे, असे तर मुळीच बोलू नका. २४ ला सकाळी १० वाजता आंतरवालीत या..! ज्यांचे गावं दूर आहे, त्यांनी आदल्या दिवशी मुक्कामी या. सभोवतालच्या अनेक गावांमधील समाज बांधव आपल्या जेवणाची व्यवस्था करणार आहेत..!
शेवटचे सांगणे एकच, आपली उपस्थिती कोट्यावधी मराठ्यांना स्फूर्ती व बळ देणारी ठरु शकते एवढे नक्की..!
🚩 जय शिवराय 🚩
✍️लेख : जेष्ठ पत्रकार दत्तात्रय कराळे

.jpeg)