मुंबई (कार्यकारी संपादक ऍड. सुभाष अंभोरे ) गोर, गरिबांच्या, अत्याचार ग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारी व ऑन द स्पॉट न्याय मिळवून देणारी सामाजिक संघटना दयावान सरकार महाराष्ट्र राज्य महिला आघाडी लातूर जिल्हा अध्यक्ष पदी "विकास दर्पण न्यूज" च्या संपादिका दबंग सामाजिक कार्यकर्त्या वैशाली ताई पाटील यांची दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी दयावान सरकार महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदीपभाई निकुंभ यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली असून पुढील सामाजिक कार्याच्या वाटचालीस वैशालीताई पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
यावेळी दयावान सरकार महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदीपभाई निकुंभ, महिला अध्यक्षा प्रियाताई वैद्य, जयेशभाई इंगळे, नितीनभाई इंगोले, सिद्धार्थभाई राक्षे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

