धर्माबाद (प्रतिनिधी नारायण सोनटक्के) नगरपरीषद कार्य क्षेत्रातील रत्नाळी येथील एका गरीब शेतकरी कुटुंबातील तथा जिल्हा शल्य चिकित्सक परभणी येथील डॉ . नागेश लखमावार यांचे चिरंजीव डॉ निरज नागेश लखमावार हा वैद्यकीय पदवी परीक्षेत घवघवीत यश संपादन करून पुढील शिक्षणासाठी यांचे M.D.Pediatrics (बाल रोग तज्ञ) या पदवीसाठी अहमदनगर येथील मेडिकल कॉलेजमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे . डॉ . निरज लखमावार हा लखमावाड कुटूंबातील अकरावा डॉक्टर आहे . डॉ . नीरज लखमावार यांचे दहावीपर्यंत शिक्षण बिलोली येथील लिटल फ्लॉवर कन्वेट स्कूल मध्ये पूर्ण झाले . व तो दहावीच्या परीक्षेत ९ ४ टक्के गुण घेऊन शाळेचे नाव लौकिक केला होता . बारावीपर्यंतचे शिक्षण नांदेड येथील यशवंत महाविद्यालयात पूर्ण झाले . वैद्यकीय पदवीचे शिक्षण शासकीय लोकमान्य टिळक ( सायन ) मेडिकल कॉलेज मुंबई , इथून वैद्यकीय पदवी प्राप्त केली आहे . वडील जिल्हा शल्य चिकित्सक परभणी डॉ . नागेश लखमावार व निरज लखमावार , त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .मा. जि.प. सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड , उद्योजक सुबोध काकांनी ,मन्मत अप्पा रोशनगावकर, डॉ . कमल किशोर काकाणी , डॉ . लक्ष्मीनारायण केशटवार , डॉ . किशन लखमावार , डॉ . श्याम लखमावार ,राम पाटील बाळापूरकर , अनिल रामोड. सुरज रामोड, मा . नगराध्यक्ष दिगंबर लखमावाड , माजी जि.प. सदस्य गंगाधर तोटलोड , गोविंद कोल्लेवाड , अशोक राऊतवाड , सचिन बोधगिरे , धावणे रामचंद्र , दिगंबर पोरडवार , डॉ . संजीवन लखमावार , डॉ .इरवंत पल्लेवाड , डॉ . अभिजित लखमावाड , डॉ . प्रतिक लखमावार , डॉ हेमंत लखमावाड डॉ . नेहा लखमावार डॉ . संजीव लोलापोड , किरण गणशेटवार .कृष्णा तिम्मापुरे,पिराईवाड बाबुराव, पोतन्ना लखमावाड,बियानवाड मलेश, बोमीनवाड राजरेड्डी,भोगावार देवन्ना धडेकर गंगाधर,संजय कदम, बाबुराव पाटील आलुरकर, सतिश शिंदे, धर्माबाद तालुक्यातील व रत्नाळी संगम ग्रुप तर्फे यांचा अभिनंदन केले आहे .
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

