धर्माबाद (प्रतिनिधी नारायण सोनटक्के) मराठवाडा मुक्ती लढ्यातील पहिले हुतात्मे गोविंदराव पानसरे यांची 77 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी हुतात्मा पानसरे यांच्या पुतळ्यावर व समाधीवर पुष्पहार व फुले वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली ,ज्यांची जन्मभूमी बदनापूर व कर्मभूमी धर्माबाद होती. वीर पानसरे यांनी जुलमी निजामाला नमविले, त्यांचे दोन ठिकाणी भव्य स्मारक उभारण्यात आले. अशा महान,तेजस्वी, व्यक्तिमत्व असलेल्या हुतात्मा पानसरे यांना कोटी कोटी प्रणाम. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी शाळेचे विश्वस्त ॲड श्रीनिवासराव रत्नाळीकर, रामकृष्ण चिंतावार, अध्यक्ष रामचंद्र पाटील बन्नाळीकर, सचिव विश्वनाथ पाटील बन्नाळीकर, सहसचिव सुरेश गंजेवार, कोषाध्यक्ष रामू पाटील बाळापूरकर, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक सन्मुख बेंबरेकर, उपमुख्याध्यापक रामेश्वर गायकवाड, पर्यवेक्षक
पुलकंठवार, जिंदमवार, व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यापूर्वी रात्री स्वरांजली गायनात पानसरे गीत कु मठपती महिमा, रंगे सुषमा, गडोड मयुरी, येडपलवार धनश्री, पललवाड मृणाली, सूर्यवंशी ज्ञानेश्वर आदि, मीठे रस से भरियो रे राधा रानी, सौ सुनिता शाहू, बिंगेवार कांताबाई, सविता नोरलावार, प्रणिता प्यादेकर, अश्विनी रामोड, वीणा काकानी, आमच्या पप्पांनी गणपती आणला, कु राजलक्ष्मी पाटील, वेदिका येंनगुंदे, राजविका भालके, ओवी हिंगणे, इरवंत गुंटुरे , स्वरा खपाटे, रुद्र सुरजकर, प्रथमेश मोकलिकर, धीरज कदम, भार्गव कहालेकर, अभिराज कुंभी, इत्यादी गाण्यामध्ये विविध विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. संगीत प्रमुख माधव वडगावे, शुद्धोधन बनसोडे, सूत्रसंचलन अरुण भुसलवाड, शैलजा बोटलावार, पानसरे प्रार्थना साठी उदयकुमार सोवळे, बालाजी पचलिंग, वादक विकास कावडे, गणेश पांडे, गायक सूर्यवंशी ज्ञानेश्वर, जाधव वरद, जाधव गोपाळ, इबितवार ज्ञानेश्वर, रुईकर विशाल, आदि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

