मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) मानवत शहरातील देवी मंदिर सभागृहा मध्ये दिनांक २९ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर रात्री ०८ ते १० या वेळेत तीन दिवशीय शारदोत्सव व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध विषयावर तीन सत्रात हे व्याख्यान होणार असून प्रथम सत्रात प्रथम पुष्प हे दिनांक २९ ऑक्टोबर रविवार रोजी आयोजित केले असून या मध्ये अखंड भारत काल - आज आणि उद्या या विषयावर, अॅड. राहुलजी नावंदर (छत्रपती संभाजीनगर) यांचे व्याख्यान होणार आहे तर, द्वितीय पुष्प दिनांक ३० ऑक्टोबर सोमवार रोजी आयोजित केले आहे जगण्यासाठी कमवा; कमवण्यासाठी जगू नका या विषयावर प्रा. संजयजी पिंपळगावकर (सेलू ) यांचे व्याख्यान होणार आहे तर, तृतीय पुष्प दिनांक ३१ ऑक्टोबर मंगळ वार रोजी आयोजित करण्यात आले असून श्रीमद्भगवतगीता आणि आधुनिक जीवन या विषयावर डॉ. उमेशजी देशमुख (पाथरी ) यांचे व्याख्यान होणार आहे. तरी या शारदोत्सव व्याख्यान मालेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना घ्यावा असे आवाहन शारदोत्सव व्याख्यानमाला समिती मानवत तथा शिक्षक पालक संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

