परभणी (प्रतिनिधी प्रदीप लांडगे) शहरातील युवा नेते शेख इलियास शेख सादेक यांची त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा आढावा घेऊन काँग्रेस परभणी जिल्हा अध्यक्ष, माजी मंत्री, आमदार सुरेश वरपुडकर यांच्या हस्ते शेख इलियास शेख सादेक यांना परभणी कॉग्रेस शोसल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी परभणी जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष सूरेश वरपूडकर, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, शहर कांग्रेस अध्यक्ष नदीम इनामदार, परभणी जिल्हा कॉग्रेस शोसल मीडियाअध्यक्ष निखिल धमनगांवकर आदी काँग्रेस पदाधिकारी यांची उपस्थिती होती . या नियुक्ती बद्दल शेख इलियास शेख सादेक यांनी "पक्षाने माझ्या वर जो विश्वास ठेऊन जी जवाबदारी दिली आहे ती प्रामाणिक पणे पार पाडेल व पक्ष बांधणीसाठी व पक्ष वाढीसाठी प्रयत्न करेल." असे मत व्यक्त केले आहे.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821


