परभणी ( प्रतिनिधी शेख अझहर) शहरातील डॉ. आंबेडकर नगर येथील माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ, परभणी संचलित माता रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहाला आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी भारत राष्ट्र समितीचे प्रदेश अध्यक्ष माणिक कदम यांनी सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. तसेच विविध युवकांनी बी.आर.एस. पक्षात प्रदेश अध्यक्ष माणिक कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे. या वेळी वसतिगृह अधीक्षक प्रमोद अंभोरे, कर्मचारी प्रकाश वडधुतिकर, शिकवणी शिक्षक शेख अझहर, बी.आर.एस. पक्षाचे अश्रोबा कदम, सर्जेराव जगताप, ज्ञानेश्वर जगताप, शिवम भैया कोरडे मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवम कोरडे, सय्यद समीर, शुभम कोरडे आदींसह बी.आर.एस. पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व वसतिगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821


