परभणी (समाजहीत न्यूज वृत्तांत) दिनांक 05/09/2023 रोजी माननीय मुख्यमंत्री साहेब मुंबई यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले त्या निवेदनात असे नमूद करण्यात आलेली आहे की पी.एस.पी.एस इंडिया मल्टीट्रेड अँड सर्विस प्राइवेट लिमिटेड आणि पी.एस.पी.एस इंडिया रिसॉर्ट क्लब या कंपनीची मालमत्ता अंदाजे 45 लाख रुपये कोषागार कार्यालय परभणी येथे शासनाने जप्त करून जमा केलेली आहे. हे प्रकरण सध्या 9 वर्ष झाले न्यायप्रविष्ठ आहे.या कंपनीमध्ये डॉ.गोविंद कामटे आणि अशोक घाटेकर यांनी आपली वैयक्तिक काही रक्कम गुंतवली होती ती रक्कम त्यांना परत शासनाने द्यावी या करिता आज महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री मा.गृहमंत्री,मा.अर्थमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आलेले आहे. हे प्रकरण M.P.I.D.A Act 1999 या कायद्या नुसार चालवून आम्हाला न्याय देण्यात यावा. हे प्रकरण लवकरात लवकर जलद गती न्यायालयात (फास्टट्रॅक कोर्टात) वर्ग करावे. निवेदनावर श्री. अशोक घाटेकर (महाराष्ट्र राज्य एस.टी कामगार सेनेचे माजी जिल्हाप्रमुख,डॉ.गोविंद कामटे (सामाजिक कार्यकर्ते तथा स्वराज इंडिया संघटनेचे जिल्हा सरचिटणीस) नितीन महाराज गोगलगावकर (राष्ट्रजण फाउंडेशनचे अध्यक्ष वीर वारकरी सेवा संघाचे कार्याध्यक्ष), अँड.निवृत्ती कदम (राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष तालुका सोनपेठ) आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
