ईटाळी जिल्हा परिषद शाळेतील विदयार्थ्यांचे नेत्रदीपक यश
September 06, 2023
0
मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) मानवत तालुक्यातील मौ. ईटाळी येथील जिल्हा परिषद शाळेतील विदयार्थ्यांनी तालुकास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवा निमित्त तालुकास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत ईटाळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कु. सिमा भागीरथ खटे हिने रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत यश संपादन केले तर कु. राधा वशिष्ठ खटे या विदयार्थिनीने वैयक्तिक नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवत यश मिळवले आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व स्वागत करताना शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरि किशन काळे, ज्ञानेश्वर होगे, वशिष्ठ खटे, भागीरथ खटे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. हणुमंत नागरगोजे, नारायण गोरे, श्रीमती. मिरा फावडे, मंगेश मलवाड, विलास शिंदे, राजेश चव्हाण, यांच्या सह शिक्षक बांधवाच्या वतीने करण्यात आले व पुढील यशस्वी वाटचालीस विदया र्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
Tags
