परभणी(प्रतिनिधी शेख अझहर) : सहारा एज्युकेश अँड वेलफेअर फाऊंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५४ व्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ३१ व्यक्तिंना राष्ट्रीय महात्मा गांधी सेवारत्न अवार्ड-२०२३ देऊन हॉटेल ग्रीन लिफ, विसावा कॅफे पार्क, कन्या प्रशाला समोर, परभणी येथे सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण मराठे असणार आहेत, तर मराठी चित्रपट अभिनेते अनिल मोरे, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी उपमहापौर भगवान वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच विशाल बुधवंत, ॲड. पवन निकम, मलेका गफार, संगीताताई जामगे, जलील पटेल, डॉ. शेख सरवर आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजमत खान यांनी केले आहे. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. अशोक जोंधळे असणार आहेत तर पुरस्कार निवड समिती अध्यक्ष रमाकांत कुलकर्णी हे असणार आहेत.
संस्थापक संपादक :प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

