परभणी ( प्रतिनिधी शेख अझहर ) जिल्हा सामान्य रुग्णालय येथे एका गरजू रुग्णाला रक्ताची अत्यंत आवश्यकता होती. तेव्हा सखी वन स्टॉप केंद्रच्या केस वर्कर सुप्रिया धबाले यांनी समाजहित अभियान प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे यांना संपर्क साधला असता तेव्हा तात्काळ रुग्णालय गाठून समाजहित अभियान प्रतिष्ठानचे कार्यकारी सदस्य शंकर बनसोडे, व हनुमंत गोर या दोघांनी जिल्हा सामान्य रुग्णालय जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथील मेट्रो ब्लड बँक येथे आज दिनांक 18 सप्टेंबर रोजी रक्तदान करून रुग्णाला रक्त उपलब्ध करून देऊन रुग्णांचा प्राण वाचविण्याचा मदत केली आहे. रक्तदान केल्याबद्दल रुग्णाचे नातेवाईक पजई यांनी समाजहित अभियान प्रतिष्ठान व सखी वन स्टॉप सेंटर, रक्तदाते शंकर बनसोडे व हनुमंत गोर यांचे आभार मानले. तसेच रुग्ण हक्क संरक्षण समिती व समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदाते शंकर बनसोडे व हनुमंत गोर यांचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. या वेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज शेख, समाजहित अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे, राज्य प्रसिध्दी प्रमुख शेख अझहर, भीमा कोरेगाव मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप वायवळ,सखी वन स्टॉप सेंटर च्या केस वर्कर सुप्रिया धबाले आदींची उपस्थिती होती.
यावेळी सखी वन स्टॉप केंद्र प्रमुख तेजस्विनी कांबळे, ब्लड बँक क्लास वन वैद्यकीय अधिकारी डॉ.बडे, डॉ. धनश्री गोंटे, बी.बी.एस.ओ. अनिल सावंत, बी.बी.एस.ओ. हाशमी साहेब, विठ्ठल शिंदे, दीपक कंडेरे, किशोर जाधव, हमीद सिद्दीकी, माधव गोचडे, अतुल जाधव, आत्माराम जटाळे, मारोती क्षिरजवार, प्रतीक भाऊ यांचे विशेष सहकार्य लाभले.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821


