मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) मानवत रोड येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय व छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठया उत्सहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थानी जिजाऊ ज्ञानतीर्थ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामराव लोहट हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सैनिक गोविंद पुंडगे, विठ्ठलराव निलवर्ण, पर्वेक्षक सुरेश भिसे, विभागप्रमुख अशोक दुधाटे यांची उपस्थिती होती. यावेळी सर्व प्रथम उपस्थित मान्यवरांचा हस्ते राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यानंतर राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख श्री. दुधारे यांनी सायकल वाटप कार्यक्रमा विषयी माहिती देऊन प्रस्ताविक केले. तर शाळेतील विदयार्थीनी आरुषी अनिल पाईकराव, हिने आपल्या चिमुकल्या आवाजात मनोगत व्यक्त केले. सई हिबारे, श्रुती येडे, अजित जाधव,भद्री कोक्कर, अक्षरा भिसे, सोनाली भिसे, भार्गवी तारे गायत्री लाडाने, ईश्वरी मगर, ज्ञानेश्वरी मगर या विदयार्थ्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त माहिती दर्शवनारे भित्ती पत्रक तयार केली होती या भित्तीपत्रकाचे विमोचन उपस्थित मान्यवरांचा हस्ते करण्यात आले. कार्यक्रमातील अनेक मान्य वरांनी आपले मनोगत व्यक्त केली यावेळी के. डी. गडगिळे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याचा इतिहास व त्याची पार्श्वभूमी या बाबत सांगितले तर अध्यक्षीय समारोप भाषणातुन श्री. रामराव दादा लोहट यांनी मराठावाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यासाठी मराठवाड्यातील नेत्यांना कराव्या लागलेल्या संघर्षाची माहिती यावेळी त्यांनी दिली. यावेळी गट साधन केंद्राचा वतीने शाळेतील एकूण ३५ विद्यार्थीनीचा पालकांचा सत्कार करुन त्यांना सायकलचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन राजू वाघ यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजकुमार पुंडगे, कौशल पामे, प्रकाश हातागळे, राहुल ढगे, सुनील काळे, ओमप्रकाश प्रजापती, विजय रंजन, सोनू कुमार, सलमान खान, कविता मेघल, कविता भिसे, कीर्ती होंडे, ज्योति कदम, अर्चना कोत्तावार, रागिणी वेदपाठक, कृष्णा राठोड, पुरुषोत्तम देवडे परमेश्वर खरात, श्याम गिराम, माणिक मगर यांच्या सह शिक्षकांनी परिश्रम घेतले.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821


