परभणी ( प्रतिनिधी शेख अझहर) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पवार कुटुंबीयांवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल आज मंगळवार 19 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळापरिसरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक फोटोस जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करत पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे शहर जिल्हाध्यक्ष सचिन पाचपुंजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष नासेर शेख ,विधानसभा अध्यक्ष शंकर भागवत,रामेश्वर आवरगंड सर ,ऍड विजय काळे, ,ऍड अरविंद देशमुख , शमशु हाश्मी,माजी नगरसेवक अमोल पाथरीकर,विनोद कणकुटे,माधव कणकुटे,शेख गफार,सुदाम तुपसुन्दरे,मनोहर गवारे,यकीन भाई, रामभाऊ भवर,वैभव शिंदे,मिलिंद ख़िलारे, चंदुराम बोराडे,कबीर खान,सय्यद असलम,सचिन सोनटक्के,रानोबा म्हेत्रे, मधुकर काळे, उबाले मामा,टायगर खिल्लारे,प्रफुल्ल घाडगे,प्रेम धबाले,माही दांडगे,सागर रनखांबे,राजा कांबळे,कृष्णा कुरदने,आदीसह राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

